✍️"वृक्ष वल्ली" ✍️ मराठी कविता.
✍️"वृक्ष वल्ली"✍️ झाडं लावा, झाडं जगवा, चालत राहुदे रान मेळावा. करू नका हिरवळीशी हेवा, झाडच करील शुद्ध हवा. जिथे असेल सुंदर से रान, औषधी प्राप्ती होईल महान. रोग - राई पासून मुक्त जीवन, कां मग ठेवू नये पर्यावरण मान. रुजू दे पाळ-मूळ धरणी मातीत, पाण्याच्या टंचाईचा होईल अंत. वाहती माती पण होईल रक्षित, झाडेच ठेवील धरणीला सजीवंत. मंदिरां विना देवाची पूजा करू, सृष्टीतील देव आहे कृपाकरू. हर-हरी देवांना निसर्गी न्याहारु, तेहतीस कोटी वृक्षांचा संच उभारू. हिरवळीत काजवे प्रकाशातील, फुलपाखरु थवे नाचतील. किलबिल पक्षांचा आनंदी गातील, वाघ-हत्ती गर्जना करतील. आरोग्य लाभेल बाळ-गोपाळां, चारा खाण्यास जमेल मेळा. आम्ही पण खाऊ पाला- पाचोळा, उन्हाळ्यात जाणवेल हिवाळा. निसर्ग चक्र आहे छान, स्वार्थी हाणीले वृक्ष मदान. कंठ दाटीले अश्रुमय झाले नयन, कसे गाणार वृक्ष वल्ली गुणगान. कवी: नरसिंहदास र. मातोंडकर (शिवदास) मडगांव - गोवा. 🌲पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌲