✍️"वृक्ष वल्ली" ✍️ मराठी कविता.


 ✍️"वृक्ष वल्ली"✍️


झाडं लावा, झाडं जगवा,

चालत राहुदे रान मेळावा.

करू नका हिरवळीशी हेवा,

झाडच करील शुद्ध हवा.


जिथे असेल सुंदर से रान,

औषधी प्राप्ती होईल महान.

रोग - राई पासून मुक्त जीवन,

कां मग ठेवू नये पर्यावरण मान.


रुजू दे पाळ-मूळ धरणी मातीत,

पाण्याच्या टंचाईचा होईल अंत.

वाहती माती पण होईल रक्षित,

झाडेच ठेवील धरणीला सजीवंत.


मंदिरां विना देवाची पूजा करू,

सृष्टीतील देव आहे कृपाकरू.

हर-हरी देवांना निसर्गी न्याहारु,

तेहतीस कोटी वृक्षांचा संच उभारू.


हिरवळीत काजवे प्रकाशातील,

फुलपाखरु थवे नाचतील.

किलबिल पक्षांचा आनंदी गातील,

वाघ-हत्ती गर्जना करतील.


आरोग्य लाभेल बाळ-गोपाळां,

चारा खाण्यास जमेल मेळा.

आम्ही पण खाऊ पाला- पाचोळा,

उन्हाळ्यात जाणवेल हिवाळा.


निसर्ग चक्र आहे छान,

स्वार्थी हाणीले वृक्ष मदान.

कंठ दाटीले अश्रुमय झाले नयन,

कसे गाणार वृक्ष वल्ली गुणगान.


कवी: नरसिंहदास र. मातोंडकर

              (शिवदास)

         मडगांव - गोवा.

🌲पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌲

Comments

Popular posts from this blog

"प्रकाश से अंधकार की ओर"

तीन पावलां गोंयचीं (कोकणी कविता )

🔥🔥विनाश🔥🔥