✍️पांढरे सरडे✍️(मराठी कविता))
✍️पांढरे सरडे✍️
जंगलं गेली, झाडे निजली
हरित जीवनशैली रखडली..!!
हवा-हवा झाले दिनचर-निशाचर
भुकी सृष्टी अंतरली..!!
निघताना प्राण देहातून सरडे
पण व्याकुळतेने वळवळले..!!
लक्ष वेधून परमेश्वराचे
सरडे लाभार्थी प्राप्त झाले..!!
प्राण ते सरड्याचे शरीर प्राप्ती
सैरावैरा गावी-शहरी सुटले..!!
फाटके कुंपण मनुष्य मनाचे
बघता नकळत शरीरात घुसले..!!
सांगू किती गुण सरड्याचे
मनुष्य कर्मात मिसळले..!!
बघता-बघता मनुष्याने
पदोपदी रंग बदलले..!!
पांघरून पोशाख नेतागिरीचे
समाज कल्याण पोखरले..!!
आतून रंग बदलणारे सरडे
शुभ्र वस्त्रात मी पाहिले..!!
डोक्यावरील कलंक त्यांनी
पांढऱ्या टोपीआड लपवीले..!!
मनुष्य देही प्राण लपवून
सरड्यानीच सुख भोगीले..!!
कवी:नरसिंदास र. मातोंडकर
(शिवदास)
स्थळ: मडगांव - गोवा.
तारीख: १४/०८/२०२६

Comments
Post a Comment